नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने दिल्ली दंगलीतील मुख्य आरोपी शर्जील इमामच्या जामीन अर्जावरील (Sharjeel Imam bail) सुनावणी घेण्यास नकार दिला होता. न्यायालयाने सांगितले की, याप्रकरणातील सुनावणीची तारीख ७ ऑक्टोंबर २०२४ आधीच निश्चित करण्यात आली. जामीन याचिकेची सुनावणी २ वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांने केला.
प्रसारमाध्यमाने शर्जील इमामच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला की, त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी २९ एप्रिल २०२२ पासून प्रलंबित आहे. ही याचिका ७ वेगवेगळ्या खंडपीठांसमोर ६२ वेळा मांडली आहे. मात्र, खंडपीठाच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत. न्यायाधीश रजेवर असल्याने या अडीच वर्षात त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.
यावेळी आरोपी शर्जील इमामची सुनावणी प्रलंबित राहिली असता दुसरीकडे तारखांमध्ये वाढ होऊ लागली. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने सुनावणी घ्यावी लागली होती. शर्जीलच्या वकिलानेही हे प्रकरण लवकर संपणार नाही असे उच्च न्यायालयाला सांगितले असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणात १ लाखांहून अधिक पानांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
याप्रकरणात १००० हून अधिक साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यायची आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सुरेश कैत आणि न्यायमूर्ती गिरीश कठपलियांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शरजीलच्या या याचिकेला सरकारी वकिलाने विरोध केला असता न्यायालयाने शर्जील इमामने दाखल केलेली सुनावणीची याचिका फेटाळली.
२०२० मध्ये देशाची राजस्थानी दिल्लीत हिंदुंविरोधात दंगली घडवून आणल्या होत्या. या दंगलीत हिंदूच नाहीतर आयबीचे अधिकारी मारले गेले. हिंदूंची घरे लुटली गेली, जाळली गेली. पोलिसांनी शर्जील इमामला दंगलीतील मुख्य आरोपी म्हणून त्याची ओळख होती. त्य़ानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.