आमदार योगेश सागर यांच्या वतीने गौरी गणपती साठी कोकणात विशेष बस रवाना

    04-Sep-2024
Total Views |
 
Ganeshotsav 2024
 
मुंबई : भाजपा चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या वतीने गौरी गणपती साठी कोकणात दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, आज प्रथम बस गणपती बाप्पा मोरया या गजरात रवाना झाली. ५ सप्टेंबर रोजी ३ विशेष एसी बस व एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
गणेश भक्तांना मध्ये कोकणात जाण्यासाठी प्रचंड उत्साह आहे, यावेळी नगरसेवक बाळा तावडे, माजी नगरसेवक श्रीकांत कवठणकर, योगेश पडवळ, रेश्मा टक्के, रुपाली चाळके, प्रमोद गुजर, मंगला सुर्वे, उमेश कोतवडेकर, मनिष पटेल, संतोष मोरे व इतर चाकरमानी उपस्थित होते.