लातूर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिेले आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी पाहणी केली.
मराठवाड्यात झालेल्या अतुवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारी लातूर दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली.
हे वाचलंत का? - "मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालंय!"
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्याला निकष दूर सारून शक्य तेवढी मदत नक्की केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.