अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! सीबीआयकडून गुन्हा दाखल
04-Sep-2024
Total Views |
मुंबई : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तत्कालिन पोलीस अधिक्षकावर दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगाव येथील तत्कालिन पोलीस अधिक्षकावर दबाव आणल्याचा आरोप आहेत. याच आरोपातून आता त्यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे १०० कोटी वसूली प्रकरणाची चौकशी आणि आता पुन्हा एकदा अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूका तोंडावर आहेत. अशात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत.