हिंदू विद्यार्थ्यांना गंध लावण्यास महाविद्यालयाने दर्शवला विरोध, विद्यार्थ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत निदर्शने केली
04-Sep-2024
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका अंतर्गत महाविद्यालयात हिंदू विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांवर आरोप केले आहेत. प्राचार्य मोहसीन अली यांनी हिंदू विद्यार्थ्यांनी गंध लावण्यास विरोध दर्शवला होता. या विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार, कॉलेजमधील कट्टरपंथी विद्यार्थ्यांना शुक्रवारी नमाजासाठी रात्री १२ वाजताच्या सुमारास बाहेर काढले. याप्रकरणाची माहिती मिळताच 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत मोहसीनवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी जय श्रीराम अशी घोषणाबाजी केल्याची घटना बुधवारी ४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना अमरोहा जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाणे परिसरात घडली. मंडी समिती मार्गावरील पियर्स चढ्ढा अंतर्गत महाविद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी याप्रकरणासंबंधी विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यात बजरंग दलचे काही सदस्यही सामील झाले. प्राचार्य मोहसीन अली हे हिंदू आणि कट्टरपंथी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात. असा आंदोलकांचा आरोप आहे. त्यांनी सांगितले की, मोहसीन अली हिंदू विद्यार्थ्यांना गंध लावण्यापासून विरोध करतात.
पुढे विद्यार्थ्यांनी सांगितले की, मोहसीन कट्टरपंथी विद्यार्थ्याी आणि हिंदू विद्यार्थ्यांबरोबर भेदभाव करतो. कट्टरपंथी विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी हात न जोडण्यास सांगितले. याच महाविद्यालयात कट्टरपंथींना शुक्रवारी सुट्टी देण्यात आली होती. तर दुसरीक़डे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर भारत माता की जय, जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमानी करू न देण्याची घोषणा केली. यावेळी झालेला गोंधळ लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरू असलेला विद्यार्थ्यांचा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान, मोहसीन यांची मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये मोहसीनने सांगितले की, नुकतेच त्यांनी महाविद्यालयाचे व्यवस्थापन हाती घेतले. महाविद्यालयात नियमांचे पालन केले जात आहे ती याधीची नियमावली होती. महाविद्यालय प्रशासनाने या नियमांमध्ये लवकरच सुधारणा केली जाईल असे सांगितले आहे.
जे काही नियम पाळले जात आहेत त्या प्रशासनाच्या उपस्थितीत या विनयभंग सुधारणा करण्याचा करार झाला. या कराराचा लेखी पुरावा देण्यात आला असून अखेर बऱ्याच संघर्षानंतर करारपत्र बनवण्यात आले होते. याप्रकरणात अंतिम क्षणी वाद मिटवण्यासाठी चर्चा करण्याती आणि आली प्रकरण शमवण्यासाठी पाऊले उचलली गेली.