मुंबई : कोकण विकास आघाडी मुंबईच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री अश्विनी वैष्णव यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन कोकणात गणपती उत्सवासाठी ३४२ जादा गाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.तसेच पुढील वर्षासाठी तब्बल ४५० ते ५०० जादा गाड्या सोडण्याची लेखी मागणी देखील मंत्री महोदयांना केले.त्याचप्रमाणे पूर्वी दादरहून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वी प्रमाणे दादरहून सोडण्याची मागणी करणारे पत्र व बांद्रा मडगाव या गाडीला अतिरिक्त थांबे वाढविण्यात यावेत असेही मागणी पत्र मंत्रीमहोदयांना देण्यात आले.
याप्रसंगी कोकण विकास आघाडी मुंबईचे संघटन महामंत्री श्री संजय सुर्वे,उपाध्यक्षा श्री संदीप चव्हाण आणि सचिव कौस्तुभ लेले उपस्थित होते.