खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणार २० लाखांचे उपदान

    30-Sep-2024
Total Views |

hike
 
 
मुंबई : राज्यातील निवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा १४ लाखांवरून वाढवून २० लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात येईल. ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे, अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठ यातील निवृत्ती वेतनधारकांना हा निर्णय लागू राहील.

कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेच्या लाभार्थींसाठी एक लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन विहीरीबाबत बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे.