अवैध अतिक्रमणांवर सरकारचा बुलडोझर! काँग्रेसचे चिथावणीखोर वक्तव्य, जमावाला भडकावण्याचा कट?

    30-Sep-2024
Total Views | 52

congress on illegal mosque demolition

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (bulldozer action)
गुजरातच्या सोमनाथ मंदिराजवळील लँड जिहाद प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. येथील प्रशासनाने ३६ बुलडोझर लाऊन सरकारी जमिनीवरील अतिक्रमणावर मोठी कारवाई करत बेकायदेशीर बांधकाम जमिनदोस्त केले होते. बेकायदेशीरपणे बांधलेल्या मशीद, दर्गे आणि थडग्यांवर ही कारवाई तब्बल महिनाभराच्या तपासानंतर सुरू करण्यात आली. मात्र काँग्रेस पक्ष आता या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरला आहे. प्रशासकीय कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसचे म्हणणे असून एका आमदाराचा चिथावणीखोर व्हिडिओही समोर आला आहे.

हे वाचलंत का? : 'अहिल्यानगर नको, अहमदनगरच हवं'; अल्पसंख्याकांनी घातलं पवारांना साकडं!

काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार अमित चावडा यांनी त्यांच्या एक्स हँडलद्वारे जारी केलेल्या निवेदनात बेकायदेशीर प्रार्थनास्थळे पाडल्याचा निषेध केला आहे. शनिवारी त्यांनी ठळक अक्षरात लिहिले की, “विकासाच्या नावावर बुलडोझरचे राजकारण दुर्दैवी आहे. वेरावळमध्ये सर्वोच्च न्यायालयाची मनाई असतानाही धार्मिक स्थळे व घरांवर बुलडोझर टाकून भीतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. राज्यकर्ते संविधानाचा विपर्यास करून मनमानी करत आहेत. आमदार अमित चावडा हे संविधानाचा हवाला देत अत्याचाराचे रडगाणे करीत असले तरी कोट्यवधी रुपयांच्या सरकारी जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाल्याचे सत्य आहे.



त्याचप्रमाणे काँग्रेस आमदार विमल चुस्मडा यांचाही एक चिथावणीखोर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दिसत आहे की, त्यांच्यासोबत उपस्थित मुस्लिमांचा जमाव टाळ्या वाजवून विमल चुस्मडा यांचे कौतुक करत आहे. विमल चुस्मडा म्हणतायत की, जेव्हा कोणी बुलडोझर आणेल, तेव्हा तुमचा मोबाइल फोन चालू करा आणि बुलडोझरसमोर झोपा. आज दर्गा पाडला गेला तर उद्या मंदिरेही पाडले जातील."
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121