"गांधी घराण्याने आयुष्यभर नाच गाणं केलं", राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर योगी आदित्यनाथ यांचा पलटवार

    30-Sep-2024
Total Views |
 
Yogi Adityanath
 
चंदीगड : उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठाबाबत केलेल्या निंदनीय टिप्पणीचा समाचार घेतला. गांधींनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर नाच-गाणं करत असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले. याला प्रत्युत्तर म्हणून योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींसह त्यांचे अख्ख खानदान काढले.
 
राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत योगी आदित्यनाथ म्हणाले, जेव्हा अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात अभिषेक होत होता, तेव्हा त्यांना (राहुल गांधी) मंदिरात नाच गाणे सुरू असल्याचे वाटत होते. कारण त्यांच्या कुटुंबाने आयुष्यभर तेच केले आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधीवर पलटवार केला आहे.
 
 
 
काय म्हणाले होते राहुल गांधी?
 
हरियाणा येथील हिसार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा राष्ट्रपती आदिवासी असल्याने त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही. तुम्हाला कोणी कामगार दिसला का? राम मंदिराचा सोहळा हे नाच गाणे होते असे बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. आता याला योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.