इस्त्रायलचा हिजबुल्लाहनंतर येमेनवर हल्ला

    30-Sep-2024
Total Views |
 
Yemen Attack
 
सना : इस्त्रायलच्या संरक्षण दलाने हिजबुल्लाहनंतर आता येमेनवर हल्ला (Yemen Attack) केला आहे. लष्करी संचालकांच्या सुचनेनुसार, हवाई दलाने रविवारी २९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. तसेच येमेनमधील रास इस्सार आणि हो़डेदाह येथे असलेल्या हुथी बंडखोरांवर विमानांद्वारे हल्ला केला.
 
इस्त्रायलच्या लष्करांनी पॉवर प्लांटस्वर आणि एका बंदरावर हल्ला केला. ज्याचा वापर तेल आयात करण्यासाठी केला जातो. इस्त्रायल लष्करांनी सांगितले की, आपल्या देशातील नागरिकांसाठी धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही शत्रूविरोधात असाच जवाब दिला जाईल. त्यांना नष्ट करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.
 
 
इस्त्रायली लष्करांच्या सांगण्यानुसार, इस्त्रायलवर नुकत्यात झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हौथी दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. यावेळी हिजबुल्लाह प्रमुख नसराल्लाहची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. तर त्यामध्ये २९जण जखमी झाले आहेत.