साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना भावली! 'धर्मवीर २'ची तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई
30-Sep-2024
Total Views |
मुंबई : प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर १'च्या यशानंतर नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनाही दुसऱ्याही भागाला उत्तुंग प्रतिसाद दिला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत तुफान कमाई केली आहे. प्रसाद ओक यांची प्रमुख भूमिका असणारा 'धर्मवीर २'चे सर्व शो हाऊसफूल होत आहेत.
'धर्मवीर २' चित्रपटा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील मराठी चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या दिवशी तब्बल १.९२ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.३५ कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या दिवसाची कमाई लक्षात घेता 'धर्मवीर २' ने देशात ७.९२ कोटींचा गल्ला जमवला आहे.
'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली असून क्षितीश दाते याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडेंनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली होती तर मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजने निर्मिती केली होती.