सुरक्षारक्षक, तसेच कर्मचारी सुद्धा सीबीआयच्या ताब्यात.
03-Sep-2024
Total Views |
कोलकाता : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर. जी. कार मेडीकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार घोष यांच्या कार्यकाळात औषध खरेदीच्या व्यवहरात अनियमितता आढळून आली होती. सीबीआय अधिकाऱ्यच्या मते, घोष यांच्या विरोधात भक्कम पुरावे आढळून आले आहेत. भ्रष्टाचार आणि फसवणूकीच्या आरोपाखाली घोष यांना ०२ सप्टेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वी देखील सीबीआयने घोष यांच्या घरावर धाड टाकली होती. आर. जी. कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य, त्याचसोबत प्रमुख आरोपी संजय रोय याच्यासह चार डॉक्टरांची सुद्धा पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली आहे. संदीप घोष यांच्या शिवाय सुरक्षा रक्षक अफसर अली खान, कर्मचारी सुमान हजारा, आणि बिप्लव सिंघा यांनादेखील अटक करण्यात आली आहे.
संदिप घोष यांच्यावर आरोप कोणते?
ऑगस्ट महिन्यात आर. जी. कार मेडीकल कॉलेजचे माजी उपअधीक्षक डॉ अख्तर अली यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. अली यांनी घोष यांच्यावर जैववैद्यकीय कचऱ्याची तस्करी करणे, अनोळखी मृतदेहाची विक्री करणे,औषध पुरवठादारांकडून लाच घेण्याचे आरोप केले.
अली यांनी न्यायालयाला असेही सांगितले की, विद्यार्थ्यांकडून परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात माजी प्राचार्य ५ ते ८ लाख रूपयांची लाच घेत असत, असा दावा करण्यात आला.
दरम्यान, आर्थिक अनियमिततेशी संबंधित प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित होण्यापूर्वी राज्य-नियुक्त एसआयटीद्वारे हाताळले जात होते.