उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर नराधमांकडून बलात्कार, हिंदू संघटनांनी आवाज उठविताच आरोपींना अटक

03 Sep 2024 17:44:08
minor-dalit-girl-abducted-and-gangraped


नवी दिल्ली : 
    उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सलीमचा मुलगा समीर आणि राजा यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप असून या प्रकरणी आणखी काही अज्ञात आरोपींचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली असून घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात निदर्शने केली. पोलिसांनी समीरसह २ आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, अज्ञात आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत असून २४ तास जंगलात ओलिस ठेवून तिचे अपहरण, सामूहिक बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच, सलीमच्या मुलांनी मित्रांसोबत दलित अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर, पीडितेच्या वडिलांनी समीरच्या कुटुंबीयांना आपली मुलगी परत करण्याची विनंती केली. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पीडितेच्या वडिलांनी स्वत: आपल्या समाजातील सदस्यांसह आपल्या मुलीचा शोध सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

पीडितेला एकटी दिसल्यानंतर समीर आणि राजा त्याच्या इतर साथीदारांनी तिला पकडले, असा आरोप आहे. या सर्वांनी पीडितेला घेऊन दूर जंगलात ओढत नेले. येथे या नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने या कृत्यांचा निषेध केला तेव्हा तिला जातीवाचक शब्द म्हटले आणि शिवीगाळदेखील केली आहे. यानंतर सर्वांनी पीडितेचे अपहरण करून तिला अज्ञातस्थळी ओलीस ठेवले, असा आरोप आहे. मुलगी बेपत्ता असल्याचे पाहून पीडितेच्या कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू करण्यात येत आहे.





Powered By Sangraha 9.0