बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्याने मुंबईत घेतले ऑफिस, महिन्याचे भाडे पाहून थक्क व्हाल

    03-Sep-2024
Total Views |
bollywood actor rent office
 

मुंबई :      बॉलीवूड सिनेस्टार अजय देवगण याने नुकतेच गजबजलेल्या अंधेरी भागात आपले व्यावसायिक कार्यालय घेतले आहे. अजय देवगणने व्यावसायिक ऑफिस १.१२ लाख मुद्रांक शुल्कासह ७ लाख रुपये प्रति महिना भाडेतत्वावर घेतले आहे. त्याचे कार्यालय लोटस डेव्हलपर्स विकसित सिग्नेचर टॉवरमध्ये स्थित आहे.




दरम्यान, दि. ०२ सप्टेंबर रोजी झालेल्या 'लीव्ह अँड लायसन्स' करारावर तब्बल १ लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क आकारण्यात आले आहे. कार्यालयाचे ठिकाण ओशिवरा येथील वीरा देसाई रोडलगत असून शहराच्या पश्चिम उपनगरातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. आजमितीस चांगल्या-कनेक्टेड ऑफिस स्पेसच्या शोधात असलेल्या व्यवसायांसाठी अत्यंत मागणी असलेले क्षेत्र बनले आहे.

दरम्यान, अजय देवगण हा बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक आहे. दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि प्रतिष्ठित पद्मश्री यासह अजय देवगणचा सन्मानदेखील करण्यात आला आहे. सिंघम, दृष्यम आणि तान्हाजी यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीतील एक पॉवरहाऊस म्हणून त्याची प्रतिष्ठा वाढविली आहे. सध्या सिंघम अगेन, रेड २ आणि दे दे प्यार दे २ हे चित्रपट आहेत.