मुंबई : मटण खात नाही पण रस्सा चालतो अशी शरद पवार गटाची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. भाजप नेते समरजित घाटगेंच्या प्रवेशावरून त्यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. अशातच आता भाजपचे समरजित घाटगे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून सूरज चव्हाणांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत शरद पवार गटाला टोला लगावला. सूरज चव्हाण म्हणाले की, "मटण खात नाही पण रस्सा चालतो. या म्हणीप्रमाणे साहेब गटाची अवस्था झाली आहे. भाजप सोबत युती चालत नाही. पण भाजपची लोकं चालतील," अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.