कल्याण : साईनाथ तारे यांच्याकडे कोणतेही पद नव्हते की ते आमच्या पक्षात कार्यरत नसून आमच्या पक्षाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. साईनाथ तारे यांनी मंगळवारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून त्याबाबत आमदार भोईर यांनी ही भूमिका मांडली आहे.
तसेच त्यांच्या पत्नी या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका होत्या. परंतु आता हे दांपत्य सध्या ठाण्यामध्ये वास्तव्याला गेले असून भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचे कोणतेही काम नाही. त्यांनी आता कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचा आणि आमच्या पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.