मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये. सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. मंगळवारी सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून राज्यभरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
हे वाचलंत का? - एसटी कर्मचारी बेमुदत संपावर! प्रवाशांचे हाल
याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्य सरकारने यासंबंधी बुधवारी बैठक बोलवली असून यात सकारात्मक चर्चा होणार आहे. राष्ट्रपती महाराष्ट्रात आहेत. आता गणपती येत आहेत. त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्रीकरिता प्रवास करावा लागतो. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवले आहेत. हा प्रश्नदेखील चर्चेतून सुटेल," असे आवाहन त्यांनी केले आहे.