मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (SNDT Women's University ABVP) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक पदांच्या भरतीची जाहिरात काढून पदभरती प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे. मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाकडे पूर्वीच्या जाहिराती नुसार अर्ज केलेल्या सर्व अर्जदाराचे शुल्क परत करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा देणात आला आहे.
हे वाचलंत का? : लव्ह जिहाद आणि धर्मांतरप्रकरणी मुख्यमंत्री धामींचे निर्देशमिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज मागवले होते. परंतु याच पदासाठी विद्यापीठाने दि. ०६ ऑगस्ट रोजी नवीन जाहिरात प्रसिद्ध करून नवीन अर्ज मागवले आहेत व त्यासाठी नवीन शुल्क भरण्याची तरतूद केली आहे. याविषयी माहिती देताना अभाविप कोंकण प्रांतमंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, मागील जाहिराती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क विद्यापीठाकडे असताना विद्यापीठ त्याच पदासाठी परत जाहिरात काढून पैसे कमावण्याचे काम करत आहे. अभाविपची आग्रही मागणी आहे की, पूर्वी अर्ज केलेल्या अर्जदारांचे शुल्क परत करण्याची कार्यवाही विद्यापीठाने तात्काळ सुरू करावी. अन्यथा अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.