लव्ह जिहाद आणि धर्मांतरप्रकरणी मुख्यमंत्री धामींचे निर्देश

    03-Sep-2024
Total Views |

Pushkar Singh Dhami

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pushkar Singh Dhami)
उत्तराखंड येथे धर्मांतरण आणि लव्ह जिहादसारखी प्रकरणे कायदा तयार होऊनही थांबत नसल्याने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांनी दिल्या आहेत. सोमवारी मुख्यमंत्री धामी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस उपमहानिरीक्षक, जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

हे वाचलंत का? : प्रार्थना सभेच्या नावाखाली महिला-बालकांचे धर्मांतरण!

लोकसंख्या बदलाची समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीदरम्यान दिले आहेत. उत्तराखंड हे इतर राज्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनू नये, यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दररोज सखोल तपास मोहीम राबवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. राज्यात कुठे गुन्हे वाढत आहेत आणि ते का वाढत आहेत यावर चिंतन करण्याकरीता सांगितले आहे.

गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती वाढली पाहिजे आणि सर्वसामान्यांचा पोलिसांप्रती विश्वास वाढला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री धामी यांनी गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.