दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
विजेत्यांना मिळणार २ लाखांपर्यंतची आकर्षक बक्षिसे
03-Sep-2024
Total Views |
मुंबई, दि. २: प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘दै. मुंबई तरुण भारत’ ( MTB ) तर्फे ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (MPCB) प्रस्तुत ‘महाएमटीबी पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपूरक सजावटीला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना २ लाखांपर्यंतची आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/47f1spE या लिंकवर जाऊन गूगलफॉर्म भरावा आणि अधिक माहितीसाठी ७०४५९६०७०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
गेल्यावर्षी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावे करून अनेकांनी या स्पर्धेत बक्षिसेसुद्धा जिंकली होती. या वर्षीही स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बक्षिसे जिंकावी, असे आवाहन दै. मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबी तर्फे करण्यात आले आहे.