मालवण पुतळा दुर्घटना! शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी
03-Sep-2024
Total Views |
मुंबई : मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती पुढे आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास घेण्यात येत आहे.
मालणवमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात सध्या संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ते दोघेही फरार झाले होते.
बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला शुक्रवारी कोल्हापूरातून अटक करण्यात आली होती. परंतू, शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्याच्याविरोधात आता सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच जयदीप आपटेचा शोध घेण्यासाठी ७ पथके तैनात करण्यात आली आहेत.