नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रविवारी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. रात्री पावसामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाला, मात्र दुपारी दोनच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर सुर्यप्रकाश पडला. कानपूरमधील ग्रीन पार्क येथे दुसरी कसोटी सलग दुसऱ्या दिवशी एकही चेंडू न टाकता पुढे ढकलली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळही एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला . तर पहिल्या दिवशीही फक्त ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या मार्गावर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही षटक होणार नसल्याने कार्यक्रमस्थळाच्या ड्रेनेजच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्या दिवशी बांगलादेशचा संघ पावसामुळे केवळ ३५ षटके खेळला असून तीन गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन आणि शादमान इस्लामला बाद केले तर रविचंद्रन अश्विनने कर्णधार नजमुल हुसेन शांतोची विकेट घेतली. पहिली कसोटी २८० धावांनी जिंकून भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.