लव्ह जिहाद! निकाह करू असे सांगून सलग २ वर्षे युवतीचे केले लैंगिक शोषण
मध्य प्रदेशात केरला स्टोरी रिटर्न्स
29-Sep-2024
Total Views |
भोपाळ : मध्य प्रदेशातील हरदा येथील आदिवासी समाजातील मुलीचे धर्मांतरण करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. आदिवासी प्रवर्गातील मुलीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी २७ सप्टेंबर २०२४ रोजी तिच्या कुटुंबियांनी हंडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रार दाखल करत आपल्या कट्टरपंथी प्रियकराने लव्ह जिहाद करून धर्मांतरण करण्यास जबरदस्ती करण्यास सांगितले असे सांगून २ वर्षे तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी पीडितेने विरोध केला असता प्रियकर निकाह करू असे सांगत तिचे लैंगिक शोषण करायचा. पीडित युवती घरी एकटी असताना शादाब तिच्या घरी आला. त्याने पीडितेला धर्मांतरण करण्याबाबत जबरदस्ती केली. त्यानंतर आपण दोघेही निकाह करू असे सांगितले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी शादाबने पुन्हा एकदा पी़डितेला फोन करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिचे लैंगिक शोषण केले.
हा प्रकार कोणाला सांगितला तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने संपूर्ण घडलेला प्रकार सांगत शुक्रवारी १९ वर्षीय तरूणी आणि तिचे कुटुंबीय हंडिया पोलीस ठाण्यात दाखल झाले असता, त्यांनी आरोपी कट्टरपंथी शादाबविरोधात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी शादाबविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९.६४ (२) (ई) आणि ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.