जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे मंदिराच्या जागी अवैध मशीद (Illegle Masjid) बांधल्याने हिंदू एकवटले आहेत. लँड जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी निदर्शने केली. या मशिदीवर बुलडोझर चालवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. १० दिवसांत कारवाई न झाल्यास कारसेवाही जाहीर करण्यात आली आहे. कट्टरपंथी समाजातील लोकांनी हिंदू संघटनांनी केलेले दावे फेटाळून ही जमीन स्वत: ची असल्याचे सांगितले. प्रशासनाने दोन्ही गटांना समजावून सांगून चौकशी सुरू केली आहे.
हे प्रकरण जबलपूर जिल्ह्यातील रांझी येथील आहे. विश्व हिंदू परिषदेने गुरूवारी मशिदीच्या संबंधित जागेसाठी एकत्रित येऊन अवैध मशिदीला विरोध दर्शवला आहे. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. गायत्री बाल मंदिर ट्रस्टच्या नावावर ही मशीद नोंदणीकृत असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. या मशिदीला लँड जिहाद ठरवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने तीन वर्षांपासून कायदेशीर कारवाई केली असून ते लढत आहेत. दरम्यान, या मशिदीच्या आकारात आणखी वाढ करण्यात आल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे.
याप्रकरणी लवकरात लवकर प्रशासनाने पाऊल उचलावे अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. याप्रकरणी येत्या १० दिवसांचा अल्टिमेट हिदूंनी दिला आहे. याप्रकरणी आता कट्टरपंथीने हिंदूचा दावा निराधार असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी संबंधित मशिद समितीचे सचिव दिलशाद अली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नमाजसाठी वाढत्या गर्दीमुळे मशिदीचे बांधकाम वाढवले जात आहे. त्यामुळे हा वादाचा मुद्दा निर्माण केला जात आहे. दिलशादने गेल्या ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या मशिदीचे वर्णन केले. तसेच विश्व हिंदू परिषदेने संबंधित मशिदीची कागदपत्रे न्यायालयात दाखवावे असे सांगितले.