अवैध मशीद बांधकामाविरोधात हिंदू एकवटले

    28-Sep-2024
Total Views |
 
Illegle Masjid
 
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीतील दांडी गावात मशिदीच्या अवैध बांधकामामुळे (Illegle Masjid) तणाव निर्माण झाला होता. यावेळी कट्टरपंथी समजातील काही लोकांनी गावातील मशीदीच्या अवैध बांधकामास सुरूवात केल्याने वाद सुरू झाला. बेकायदेशीर बांधकामावर हिंदू समाजातील लोकं रस्त्यावर उतरले असून मशीदीच्या भिंतीचा भाग एका कोसळला होता. त्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी गावात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून ही घटना २७ सप्टेबर २०२४ रोजी घडली होती.
 
प्रसारमाध्यमानुसार, कट्टरपंथी समुदायातील फिदा हुसैन आणि त्याचा भाऊ आरिफ यांनी मशिदीसाठी भूखंड दिला होता. यानंतर आता कट्टरपंथी समाजाच्या लोकांनी त्या भूखंडावर मशिदीचे अवैध बांधकाम सुरू केले. परवानगीशिवाय मशिदीच्या भिंतीवर रंग देण्याचे काम सुरू करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.
 
याप्रकरणी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत बांधकाम बंद पाडले गेले. त्या जागेवर कुलूप लावण्यात आले होते. हिंदूंनी संबंधित मशीद पाडण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई केली नसल्याने हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
दगडफेकीनंतर पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले. हि लोकं हिंदू समाजातील असून त्यांच्यावर अवैध बांधकामाची भिंत पाडल्याचा आरोप होता. या अटकेने हिंदू गटातील लोकं आणखी संतापले आहेत. यावेळी खासदार आर्य यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. अटक करण्यात आलेल्या तरूणांची बिनशर्त सुटका करून बेकायदेशीर बांधकाम पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी धरणे धरलेल्या नागरिकांची प्रमुख मागणी होती. सध्याची तणाव परिस्थिती पाहता गावात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.
 
यावेळी अटक असलेल्या तरूणांची त्यांनी लवकरात लवकर सुटका करावी. यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. असे आंदोलकांनी प्रतिपादन करत प्रशासनाविरोधात आवाज उठवून निदर्शने केली आहेत.