मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Protests against Durga Puja) दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू समाजाकरीता अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामिक कट्टरपंथींना दुर्गापूजेच्या कार्यक्रमांना धमक्या दिल्या असून पुजेदरम्यान मूर्ती विसर्जन, सुट्ट्या आणि कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. 'दुर्गापूजेच्या सुट्ट्या रद्द न केल्यास आणि मूर्ती विसर्जनासारखे उपक्रम थांबवले नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू', असा इशाराही 'इन्साफ कीमकारी छात्र-जनता' या इस्लामिक संघटनेकडून बांगलादेश सरकारला देण्यात आला आहे.
हे वाचलंत का? : संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानला फटकारले!
मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडेच एक जमावाने ढाक्याच्या सेक्टर १३ मध्ये यासंदर्भात मोर्चा काढला आणि हिंदूंनी दुर्गापुजेसाठी खेळाच्या मैदानाचा वापर केल्याच्या विरोधात निषेध केला. 'जस्टिस सर्व्हिंग स्टुडंट्स-पब्लिक' सारख्या इस्लामिक कट्टरपंथी संघटनेच्या वतीने निदर्शने करणाऱ्या लोकांनी पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्याची मागणी करणारे १६ पेनंट मागण्या असलेले फलक धरले होते. त्यांचे म्हणणे आहे की, येथे हिंदू लोकसंख्या दोन टक्क्यांपेक्षा कमी असल्याने, दुर्गापूजेसाठी सार्वजनिक सुट्टी दिली जाऊ नये कारण मुस्लिम बहुसंख्य लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. त्यांच्या मागण्यांमध्ये बांगलादेशातील अनेक विशेष जमिनींवर कब्जा करून बांधलेली मंदिरे हटवण्याचाही उल्लेख आहे.
उल्लेखनीय आहे की बांगलादेशमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये हिंदू समुदाय पूर्ण उत्साहाने सहभागी होतो. दुर्गा पूजा हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. पण यंदा 'इन्साफ कीमकारी छात्र-जनता' सारख्या कट्टरवादी गटांनी या सणाविरोधात इशारा देऊन हिंदू समाजाला भीती आणि चिंतेमध्ये टाकले आहे. बांगलादेश हा इस्लामिक देश असून बिगर इस्लामी सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी देऊ नये, असे या संघटनांचे म्हणणे आहे.
बांगलादेशातील हिंदू नागरिकांनीही भारतविरोधी असले पाहिजे!
इस्लामिक कट्टरपंथी संघटनेची आणखी एक मागणी आहे की, “भारत हा बांगलादेशचा राष्ट्रीय शत्रू असल्याने बांगलादेशातील हिंदू नागरिकांनीही भारतविरोधी असले पाहिजे. त्यामुळे पंडाल आणि मंदिरांमध्ये भारतविरोधी बॅनर आणि भारतविरोधी घोषणा देण्यात याव्यात.