बांगलादेशींचा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

सुरक्षा दलाने आगरतळा रेल्वेस्थानकावर घेतले ताब्यात

    28-Sep-2024
Total Views |
 
Bangladeshi Peoples
 
आगरतळा : बांगलादेशातील नागरिकांनी अवैधरित्या भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी आगरतळा रेल्वे स्थानकावर पाच जणांना अटक करण्यात आली होती. शासकीय रेल्वे पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाने तसेच रेल्वे संरक्षण दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केल्याची घटना आहे.
 
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये नसीम मोल्ला आणि शाठी मोल्ला अशा दोन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये एक रोहिंग्या अदुस सलाम आणि दोन भारतीय दलाल शाबीर आरब आणि अब्दुल सकूर फकीर मोहम्मद खवरा यांचा समावेश आहे.
 
यावेळी शुक्रवारी पुष्टी केली की जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात अटक केलेल्या व्यक्तींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.