मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jagdeep Dhankhar Sanatan) "आपली संविधानिक मूल्ये सनातन धर्मातून निर्माण झाली आहेत. राज्यघटनेची प्रस्तावना सनातन धर्माचे सार प्रतिबिंबित करते. सनातन सर्वसमावेशक आहे; सनातन हाच मानवतेला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग आहे.", असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. गुरुवारी राजस्थान येथे आयोजित हिंदू अध्यात्मिक आणि सेवा मेळा २०२४ च्या उद्घाटनपर भाषणात ते उपस्थितांशी बोलत होते.
हे वाचलंत का? : उघड्यावर नमाज अदा केल्याने गणपत विद्यापीठात मोठा वाद!
पुढे ते म्हणाले, "भारताचे विभाजन करण्यासाठी सध्या काही लोक किती प्रमाणात सक्रिय आहेत याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा भयंकर शक्तींचा निःपात करण्याची नितांत गरज आहे. यासाठी आपण सतर्क राहून त्वरीत कार्य केले पाहिजे. देशात पद्धतशीरपणे धर्मांतर होत आहे, जे आपल्या मूल्यांच्या आणि घटनात्मक तत्त्वांच्या विरुद्ध आहे. 'शुगर कोटेड फिलॉसॉफी' विकली जात असून समाजातील दुर्बल घटकांना लक्ष्य केले जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. हा राजकीय, संस्थात्मक आणि सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे.''