बेरूत : इस्त्रायलने २६ सप्टेंबर रोजी दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ला केला. यावेळी हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन युनिट प्रमुख आणि कमांडर मोहम्मद सरूर याला ठार मारण्यात इस्त्रायलला यश आले आहे. याघटनेचा इस्त्रायलच्या लष्करांनी दुजोरा देण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे लेबनॉन येथे युद्ध थांबवण्यास नकार दिल्याचा निर्णय इस्त्रायलने घेतला आहे.
या घटनेआधी हिजबुल्लाहचा मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेल्या इब्राहिम कुबैसीला जागीच ठार करण्यात आले होते. यावेळी इस्त्रायलने हिजबुल्लाहसोबत युद्धविरामास नकार दिला आहे. याउलट युद्ध सुरू ठेवण्याचे आदेश इस्त्रायलने लष्करांना दिले आहेत.
यावेळी इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री कॅट्झ यांनी ट्विट करत युद्धविराम न देण्याचा निर्णय घेतला. यावेळी लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्याने गुरूवारी रात्री इस्त्रालयच्या हल्ल्यात एकूण ९२ जणांचा मृत्यू झाला. तर त्यातील १५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.