मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली आहे. एका अज्ञात महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी फेकून दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात ही घटना घडली आहे.
हे वाचलंत का? - "सकाळी उठून खोटे आरोप करायचे आणि कोर्टात गेल्यावर..."; नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल
गुरुवारी सायंकाळी एका महिलेने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात गोंधळ घालत नासधूस करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकून दिल्याचीही माहिती पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओही पुढे आला आहे.
दरम्यान, ही महिला कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ही महिला कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अज्ञात महिला कुठून आली? आणि ती मंत्रालयात का शिरली? याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, या महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.