लव्ह जिहादचा डाव उधळला; डेहराडून रेल्वे स्थानकात तुफान राडा

    27-Sep-2024
Total Views | 85

Dehradun Love Jihad Case

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dehradun Love Jihad Case)
उत्तराखंडच्या डेहराडून रेल्वे स्थानकावर दोन गटांत तुफान राडा झाल्याचे निदर्शनास आले आहे. एक हिंदू तरुणी बदायूंहून जेव्हा डेहराडूनला पोहोचली, तेव्हा तिचा मुस्लिम प्रियकर तिला घेण्यासाठी रेल्वेस्थानकात आला होता. हिंदू तरुणीचे नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तरुणीला आपल्या कह्यात घेतले.

हे वाचलंत का? : अमेरिकेत हिंदू मंदिरांवर हल्ले; स्वामी अनिरुद्धाचार्यंची यूएस सरकारकडे महत्त्वाची मागणी

रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला राहणारे मुस्लिम समाजाचे लोकही मुलाच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. बातमी मिळताच एसएसपी अजय सिंह मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.

मुस्लीम मुलगा बदायूंचा रहिवासी असून सेलाकोई येथील एका कारखान्यात काम करतो, असे सांगण्यात येते. त्याचा हिंदू तरुणीशी संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला होता. बदायूंमधून मुलगी बेपत्ता होताच तिच्या कुटुंबीयांना ती डेहराडूनला आल्याचा संशय आला, त्यानंतर तिचे नातेवाईक येथे सक्रिय झाले.
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121