मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल!
27-Sep-2024
Total Views |
मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी त्यांना तातडीने बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुढे आली आहे.
मंत्री छगन भुजबळ एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. याकालपासून थोडासा ताप आणि घशाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी त्यांना त्यामुळे त्यांना विशेष विमानाने पुण्यातून मुंबईत आणण्यात आले. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर आहे. त्यांनी स्वत: आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.