आमी जे तोमार! माँजोलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर प्रदर्शित

    27-Sep-2024
Total Views |
 
bhool bhulaiya 3
 
 
मुंबई : बहुचर्चित 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला आहे. तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालन अर्थात माँजोलिका पर येणार असल्यामुळे विशेष आनंद प्रेक्षकांना झाला आहे. आता पुन्हा एकदा कार्तिक आर्यन भूतांना आटोक्यात आणायला सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाचा भयानक टीझर प्रदर्शित झाला आहे.
 
'भूल भूलैय्या ३'च्या टीझरमध्ये पाहायला मिळतं की, माझं सिंहासन कोणाला दिलं? असं म्हणत चवताळलेली मॉंजोलिका एका राजाला फरफटत नेताना दिसते. पुढे बंद दाराआड मॉंजोलिकाच्या रुपात विद्या बालन खुर्ची हातात घेऊन आक्रोश करताना दिसते. तो पाहिल्यावर पहिल्या भागात तिने उचलेल्या पलंगाचेच दृश्य डोळ्यांसमोर येते. नंतर सगळीकडे गुलाल उधळलेला दिसतो. लाल रंगामध्ये हातात मशाल धरत संपूर्ण काळ्या कपड्यात कार्तिक आर्यनची एन्ट्री होताना दिसते. पुढे तृप्ती डिमरी रोमँटिक अंदाजात पाहायला मिळते. कार्तिक आर्यन आणि मॉंजोलिकाचा थेट सामना होताना दिसणार आहे.
 
 
 
'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागात दिसलेली विद्या बालन 'भूल भूलैय्या ३'मध्ये पुन्हा एकदा भेटीला येणार असल्याने रंजकता अधिक वाढणार आहे. या दिवाळीत 'भूल भूलैय्या ३' रिलीज होताना दिसणार आहे. अनीस बाझमींनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांच्या प्रमुख भूमिका आहे.