उत्तर प्रदेशमधील लोककला जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर होणार

    26-Sep-2024
Total Views |


उत्तर प्रदेश  

उत्तर प्रदेश : राज्यात ‘उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो’ (यूपीआयटीएस) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत नोएडा येथील ‘इंडिया एक्स्पो सेंटर’ मध्ये हा महोत्सव होणार आहे. या पाचदिवसीय महोत्सवात उत्तर प्रदेश राज्यातील पारंपरिक लोकनृत्य आणि लोकगीते जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर होणार आहेत. रशिया, बोलिविया, कजाखस्तान, ब्राजील, वेनेन्जूएला, इजिप्त आणि बांग्लादेश या देशांमधील कलाकार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. प्रयागराजमधील ढेढिया नृत्य, बांदयातील पायदंडा नृत्य, अयोध्येतील कथ्थक याशिवाय मयूर नृत्य, थारू नृत्य, राई नृत्य असे विविध उत्तर भारतीय नृत्यप्रकार या महोत्सवात सादर होणार आहेत.