'बिग बॉस'च्या घरात निक्की ढसढसा का रडली?

    26-Sep-2024
Total Views |

nikki  
 
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व २८ जुलै २०२४ ला सुरू झाले. १०० दिवसांचा फॉर्मेट असलेल्या या कार्यक्रमाने मात्र यंदा ती अट मोडित काढत केवळ ७० दिवसांचाच खेळ रंगवायचा निर्णय घेतला आहे. आणि जसा फिनाले जवळ येत आहे त्यानुसार टास्क अधिक कठिण केले जात आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात नवा टास्क 'महाचक्रव्युह' पाहायला मिळाला. या टास्क नंतर निक्की तंबोळी रडताना दिसली.
 
तर झालं असं की, या टास्कसाठी जोड्या पाडण्यात आल्या. 'महाचक्रव्युह' टास्कमध्ये सदस्यांना 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी २५ लाख रुपये ही बक्षिसाची रक्कम होती. या 'महाचक्रव्यूह'च्या खेळात एका सदस्यांच्या डोळ्या पट्टी बांधलेली असेल. तर दुसरा सदस्य त्याचे डोळे बनून त्याला मार्गदर्शन करणार.
 

nikki  
 
'महाचक्रव्यूह'चा खेळ खेळण्यासाठी पहिली जोडी धनंजय आणि जान्हवी गेली. त्यांनी ६ लाख २५ हजार रुपयांपैकी १ लाख ३० हजार मिळवले. तर पुढे अंकिता आणि अभिजीतच्या जोडीने ३ लाख १५ हजार रुपये कमावले. वर्षा आणि निक्की यांच्या जोडीने २ लाख ८५ हजार कमावले. पण, निक्कीचा टास्क संपला तेव्हा ४३ सेकंद बाकी राहिले होते. या ४३ सेकंदात ती आणखी झेंडे गोळा करून रक्कम जमा करु शकली असती. पण, वेळा वाया गेल्यामुळे ती प्रचंड नाराज झाली आणि निक्की रडायला लागली.
 
याशिवाय, टास्कमध्ये तिने ५० हजार रक्कम असलेली चांदीची वीट आणली नाही. वर्षा यांनी व्यवस्थित मार्गदर्शन न केल्यामुळे निक्कीने त्या चांदीच्या विटेऐवजी रिकामी भांडं उचललं. यामुळे टीमचे मोठे नुकसान झाले यामुळे कमी रक्कम कमावल्यामुळे निक्की ढसाढसा रडली. निक्की रडत म्हणाली की, 'खरंच किती वाईट खेळलोच, याची मला लाज वाटते. मी कोणालाही दोष देत नाही आहे पण, खरंच चांगला खेळता आलं असतं".