मिलेट्सच्या सहाय्याने तयार केली ५० चित्रं! मोका विजय कुमार यांची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

    26-Sep-2024
Total Views |
 
Moka Vijay Kumar
 
आंध्र प्रदेश : विशाखापट्टनम मधील कलाकार ‘मोका विजय कुमार’ यांचे नाव ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये कोरले गेले आहे. ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये ‘वेगळे आणि उल्लेखनीय’ कार्य करणारे कलाकार म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. तृणधान्याच्या (मिलेट्स) सहाय्याने ५० चित्र तयार करण्यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. ही सगळी चित्रे त्यांनी अथक प्रयत्न, संशोधनाच्या सहाय्याने तयार केले आहे. या चित्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या चित्रांचा समावेश आहे. याआधीही त्यांनी ‘मिलेट्स’ पासून तयार केलेली चित्रे खूप प्रसिद्ध झाली आहेत.