मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Love Jihad Sangli) सांगलीतील एका १८ वर्षे पूर्ण झालेल्या हिंदू तरुणीची काही हिंदुत्ववादी संघटनांनी जिहाद्यांच्या तावडीतून सुटका केली आहे. तरुणीचे जबरदस्ती धर्मांतरण करून एका जिहाद्याने तिच्यासोबत विवाह केला होता. सदर बाब हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांच्या लक्षाच आली. त्यांनी त्या हिंदू तरुणीची जिहाद्यांच्या तावडीतून सुटका करून तिचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात घेतले. यासाठी हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हिंदू तरुणी शाळेत जात असतांना एका जिहाद्याने लव्ह जिहादच्या माध्यमातून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याच्याशी विवाह केला. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून तिचे इस्लाममध्ये जबरदस्ती धर्मांतर केले. मुलीच्या आई - वडिलांनी याविषयाची तक्रार नितीन शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्ते व पोलिसांच्या सहाय्याने पीडित मुलीपर्यंत पोहोचणे शक्य झाले.
तेव्हा हिंदू तरुणीला तिच्या नातेवाईकांनी व हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी कह्यात घेऊन तिची सुटका केली. तिचे समुपदेशन करून, शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात घेतले. मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला फसवून भावनिक आणि मानसिक दबाव निर्माण करून तिचे जबरदस्ती धर्मांतर केले होते.