इस्त्रायलचा युद्धविरामास नकार

26 Sep 2024 19:31:33
 
Israel Vs Hezbollah
 
बेरूत : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉन येथे कट्टरपंथी दहशतवादी संघटनेचा हिजबुल्लाहसोबत युदधविरामाचा प्रस्ताव नाकारला आहे. अमेरिका आणि फ्रान्समध्ये युद्धविरामाचा प्रस्ताव आणला गेला होता. त्यानंतर इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात असणाऱ्या युद्धाला युद्धविरामाचा प्रतिसाद देण्यात आला होता. मात्र इस्त्रायलने युद्धविरामाला नकार दिल्याची घटना २५ सप्टेंबर दिवशीची आहे.
 
युद्धविराम नाकारताना, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्त्रायल संरक्षण दलांना म्हणजेच आयडीएफला लेबनॉनने पूर्ण ताकदीने लढाई करावी असे निर्देश दिले आहेत. तसेच याचबरोबर न्यूतनाहू यांच्याप्रमाणे इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅट्श यांनी युद्धविराम स्वीकारले नाही. ते म्हणाले की, उत्तरेकडे युद्धविराम थांबणार नाही. विजय मिळेपर्यंत आणि उत्तरेकडील रहिवाशी त्यांच्या घरी सुरक्षित परत येईपर्यंत आम्ही हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरूद्ध लढत राहू.
 
हिजबुल्लाह वापरत असलेल्या दळणवळणाच्या उपकरणांद्वारे हल्ले करत असल्याचे सांगितले गेले आहे. हे युद्ध आणखी किती महिने किंवा दिवस सुरू राहिल तसेच त्याचे पडसाद किती दिवस असतील हे येणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0