'भारत माता की जय' घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यध्यापकाकडून जबर मारहाण

    26-Sep-2024
Total Views |
 
 Bharat Mata Ki Jay
 
दीव : एका इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी भारत माता की जय  (Bharat Mata Ki Jay)  अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र त्यांना घोषणा देणं महागात पडलं आहे. भारत माता की जय या घोषणेने शाळेच्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. ही घटना दीव येथील असून ५ सप्टेंबर रोजी घडली होती. मुख्यध्यापकाचे नाव फादर एडमंड मैस्करेनियस असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
संबंधित घडलेली घटना ही ५ सप्टेंबर शिक्षक दिनादिवशीची आहे. यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय अशा घोषण दिल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा मुख्यध्यापकांना आवडल्या नाहीत यामुले त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांचे आई-वडील हे अशिक्षित असल्याने त्यांनी याविरोधात पाऊल उचलले नाही. मात्र यावेळी हिंदू संघटनांनी मध्यस्थी करत घडलेल्या घटनेप्रकरणी मुख्यध्यापकाविरोधात कलेक्टरकडे तक्रार दाखल केली आहे.
 
दरम्यान, याप्रकरणात आता मुख्यध्यापकाविरोधात दीव पोलिसांकडे गुन्हा दाखल करा अशी मागणी संघटनांनी केली. त्यानंतर मुख्यध्यापक फादर एडमंड मैस्करेनियसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता कलम ११५ (२) आणि किशोर न्याय अधिनियम ८२ (१) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.