अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही दफन होणार! काय आहे कारण? - वाचा सविस्तर
26-Sep-2024
Total Views |
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटलेत. मात्र, अजूनही त्याचा अंत्यविधी करण्यासाठी जागा सापडलेली नाही. दरम्यान, आता अक्षय शिंदेच्या आईवडीलांनी त्याचे दफन न करता दहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरु आहे.
दिनांक २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला होता. परंतू, आपल्या मुलाची हत्या केली असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या आईवडीलांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. यावर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मात्र, अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्याप जागा मिळालेली नाही. बदलापूरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे यासाठी दुसऱ्या जागेचा शोध सुरु आहे. अक्षय शिंदेच्या आईवडीलांनी त्याच्या मृतदेहाचे दफन न करता दहन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून भविष्यात काही पुरावे लागल्यास मृतदेह बाहेर काढता येईल. परंतू, त्यासाठीसुद्धा अद्याप जागा सापडलेली नाही. अक्षयचा अंत्यविधी करण्यासाठी प्रशासनाकडून जागेचा शोध घेण्यात येत आहे.