राऊतांच्या मुद्द्यावर मला काही घेणंदेणं नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
26-Sep-2024
Total Views |
अमरावती : संजय राऊतांच्या मुद्द्यावर मला काही घेणंदेणं नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. संजय राऊतांना मानहानी प्रकरणात १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच संजय राऊतांनी अजित पवारांवर टीकाही केली होती. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मला माझ्यापुरतं विचारा. रोज सकाळी उठूव कुणीतरी काहीतरी विचारणार, हे योग्य नाही. मला त्यांच्याशी काय देणंघेणं आहे. त्यांनी काय म्हणायचं हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही बांधिल नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "महायूतीने काय विकास केला, सरकारने काय काय दिलं, भविष्यात काय देऊ पाहतोय हे सगळं तुमच्यासमोर ठेवायचं काम केलं आहे. लवकरच आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यावर वेगवेगळ्या उद्धाटन आणि भूमिपूजनाला मर्यादा येतात. निवडणूकीच्या प्रचाराची धामधूम सुरु होईल. किती लोकं उभे राहणार आणि कुणाला किती जागा मिळणार याबद्दल थोडी सहनशीलता दाखवा. महायूतीचं ठरल्यावर आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगू," असेही ते म्हणाले.