मुंबई : शेअर बाजार सुरुवातीच्या घसरणीतून सावरला असून सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स २५५.८३ अंकांनी वधारून ८५,१६९.८७ पातळीवर स्थिरावला तर एनएसई निर्देशांक निफ्टी ५० ६३.७५ अंकांनी वधारत २६००४.१५ वर पोहोचला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सुरुवातीच्या तोट्यातून सावरले असून शेवटच्या सत्रात विक्रमी उच्चांकावर बंद झाला.
दरम्यान, बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स २५५.८३ अंकांनी किंवा ०.३० टक्क्यांनी वाढून ८५,१६९.८७ च्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. आज सेन्सेक्स ८४,७४३.०४ आणि ८५,२४७.४२ च्या रेंजमध्ये व्यवहार केला. याआधी, गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १७१ अंकांनी घसरला होता.
सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २० समभागात वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये टॉप-५ पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, टायटन, कोटक बँक आणि एसबीआय या समभागांत मोठी घसरण झाली आहे.