मराठमोळ्या प्रिया बापटने ऐश्वर्या रायला टाकलं मागे, ‘या’ यादीत पटकावला दुसरा क्रमांक
25-Sep-2024
Total Views |
मुंबई : मिस वर्ल्ड हा १९९४ चा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनला मराठमोळ्या अभिनेत्रीने मागे टाकले आहे. आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री प्रिया बापट हिने ऐश्वर्यालाही मागे टाकलं असून तिचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.
आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवल्यानंतर प्रिया बापटने आनंद व्यक्त केला आहे. प्रिया म्हणाली की, “आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते. प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आयएमडीबीकडून मिळालेली ही एक पावती आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते जे माझ्यावर आणि मी केलेल्या कामावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या वर्षी माझ्याा आगामी रिलीज होणाऱ्या प्रोजेक्ट्ससाठी खूप उत्सुक आहे. या सर्व कलाकृती खूपच छान आहेत आणि त्यावर प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे.”
ईशान खट्टरने त्याचा पहिला क्रमांक सलग तिसऱ्या आठवड्यात कायम ठेवला असून ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर (Kareena Kapoor), शाहरुख खान आणि सलमान खान अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर आहेत. तर, या यादीत तुंबाड चित्रपट फेम सोहम शाहने पाचवे स्थान मिळवले आहे. विक्रांत मॅस्सीने आपल्या क्राइम ड्रामा चित्रपट ‘सेक्टर ३६’ च्या ओटीटी प्रीमियरनंतर या यादीत ९वे स्थान मिळविले आहे, तर त्याचा सहकलाकार दीपक डोबरियाल ३७व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी आपल्या आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ मुळे ८व्या क्रमांकावर आहे. तर तिचा सहकलाकार राजकुमार राव २१व्या स्थानावर आहे.
प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास प्रिया बापटची वेब सीरिज ‘रात जवान है’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा शो मुलांचे संगोपन करताना आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या तीन मित्रांच्या कथेवर आधारित आहे.