मनबा फायनान्स आयपीओला संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद!

    25-Sep-2024
Total Views |
manba finance ipo institutional investor demand
 

मुंबई :    मनबा फायनान्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) बाजारात दाखल झाला असून गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रचंड मागणीमुळे मनबा फायनान्स आयपीओने दुसऱ्या दिवशी ७३.१८ पट सबस्क्राईब झाल्याचे दिसून आले. तसेच, दुसऱ्याच दिवशी मनबा फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार(एनएसई)च्या डेटानुसार, १५१ कोटी रुपयांच्या प्रारंभिक शेअर्स विक्रीला ८७,९९,००० शेअर्सविरुध्द 64,39,20,375 शेअर्ससाठी ऑफर प्राप्त झाली आहे. आयपीओच्या माध्यमातून गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भागाला १७२.२३ पट सदस्यत्व मिळाले तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या श्रेणीने ७०.१८ पट सबस्क्रिप्शन घेतली आहे.


मनबा फायनान्स लिमिटेड ऑटो लोन, युज्ड कार, छोटे व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यासाठी अर्थपुरवठा करते. कंपनी सध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये ६६ ठिकाणी कार्यरत आहे. आयपीओकरिता अंतिम मुदत दि. २५ सप्टेंबर रोजी असेल. तसेच, आयपीओतून मिळालेल्या रकमेचा उपयोग भांडवल आधार वाढवण्यासाठी, भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.