मुंबई : देशातील मोठी ब्रोकरेज फर्म झीरोधाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये चांगला नफा कमावला आहे. झीरोधाकडे ग्राहकांच्या डिमॅट खात्यांमध्ये ५.६६ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम असून ४,७०० कोटींचा नफा कमावला आहे. आमची नेटवर्थ क्लायंट फंडाच्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. आम्हाला केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वात सुरक्षित ब्रोकरेज फर्म बनले आहे, असे झीरोधा सह-संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितले.
झीरोधाच्या क्लायंटने १ लाख कोटींहून अधिक अप्राप्त नफा कमाविला असून वेगाने वाढणारा शेअर मार्केट, किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, मार्केटमधील आयपीओ सक्षमता, ग्राहकांचा विश्वास यासारख्या बाबींमुळे ब्रोकरेज फर्मच्या वाढीत महत्त्व राहिले आहे. फर्म आता आपल्या महसुलासाठी फ्युचर्स अँड ऑप्शन्स(F&O) वरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देईल, असेही नितीन कामथ यांनी सांगितले.
आर्थिक वर्ष २४ मध्ये झीरोधा गुंतवणूकदार ग्राहकांच्या डीमॅट खात्यांमध्ये ५.६६ लाख कोटींहून अधिक रक्कम असून फर्मचे एकूण उत्पन्न ८,३२० कोटी रुपये इतके होते. झीरोधा तांत्रिक प्रणाली स्थिरता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी काम करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान प्लॅटफॉर्मवर पाच तांत्रिक समस्या नोंदवण्यात आल्या होत्या. इतर तांत्रिक घटनांनी २ टक्क्यांपेक्षा कमी ग्राहकांना प्रभावित केले असून कंपनीची एकूण टीम १,२०० कर्मचारी आहे.