मुंबई : अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असणारा भूल भूलैय्या हा चित्रपट २००२ साली आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ साली आला होता. आता लवकरच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' कधी येणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कियारा अडवाणी होती तर आता तिसऱ्या भागात तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. आणि महत्वाचे म्हणजे 'भूल भूलैय्या'चा पहिला भाग गाजवणारी विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.
'भूल भूलैय्या ३'चं पहिलं पोस्टर समोर कार्तिक आर्यन आणि 'भूल भूलैय्या ३'च्या टीमने चित्रपटाचं अधिकृत पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये एक दरवाजा दिसत असून त्याबाहेर आवळून घट्ट बांधलेले गंडेदोरे आणि मोठं कुलुप दिसत आहे. त्या दरवाजावर ३ हा आकडा लिहिलेला दिसतोय. अशाप्रकारे 'भूल भूलैय्या ३'ची घोषणा करण्यात आली आहे. दरवाजा खुलेगा.. इस दिवाली असं कॅप्शन या फोटोवर लिहिलेलं दिसत आहे. अशाप्रकारे 'भूल भूलैय्या ३' यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.
तसेच, कार्तिकचा 'भूल भूलैय्या ३' अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'ला टक्कर देणार असं दिसत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने 'सिंघम’च्या माध्यमातून एक संपूर्ण पोलिस विश्व निर्माण केले आहे. आता 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर हे देखील या पोलीस विश्वाचा एक भाग असतील. आता दिवाळीत जर का हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाले तर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे पाहणे महत्वाचे असेल.