मुंबई : बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेतर्फे कुर्ल्यातील ‘गांधी बालमंदिर’ या शाळेत एक दिवसीय 'बाल लोककला प्रशिक्षण’ शिबिर पार पडले. प्रशिक्षक प्रा.डॉ. शिवाजी वाघमारे यांनी या कार्यक्रमात शाळेतील मुलांना लोककलांची ओळख करून दिली. आपल्या खड्या, कणखर आवाजांत त्यांनी गण ,भारुड, गोंधळ असे विविध लोककलाप्रकार सादर केले आणि विद्यार्थ्यांना त्यावर ठेका धरायला लावला. २५० मुलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलें आणि सहकार्यवाह हनुमान पाडमुख यांनी आभारप्रदर्शन केले.
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, बृहन्मुंबई शाखेचें अध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष सागवेकर, कार्याध्यक्षा ज्योती निसळ, कार्यवाह आसिफ अन्सारी, सहकार्यवाह हनुमान पाडमुख, कोषाध्यक्षा यशोदा माळकर, सदस्य लव क्षीरसागर, गणेश तळेकर, महेश कापडोस्कर, देवू माळकर आणि ‘गांधी बालमंदिर’ शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. 'जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.