कारमेल शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना खाऊ घातले गोमांस

    25-Sep-2024
Total Views |
 
Beef
 
दिसपूर : आसाम येथील कारमेल शाळेत स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांना गोमांस खाऊ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत कारमेल शाळेच्या प्रशासनाकडे याप्रकरणी तक्रार केली असता, त्यांनी याप्रकरणाची दखल घेण्याऐवजी विद्यार्थ्यांना धमकावले आहे. ही बाब मुलांच्या पालकांना समजताच त्यांनी या घडलेल्या घटनेसंबंधीत एफआरआय दाखल केला आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली.
 
याप्रकरणात जारी केलेल्या स्थानिक अहवालानुसार सांगण्यात आले आहे की, इयत्ता ७ वीत शिक्षण घेणाऱ्या स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांनी जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले. मणिपूर विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना आधी लपवून ठेवण्यात आली होती. 
 
शाळेबाहेरील दुकानदारांकडून यासंबंधीत घटनेची माहिती मिळाल्याने एका पालकाने सांगितले की, दुकानदाराने त्याला शाळेत गोमांस वाटप होत असल्याची माहिती दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले की त्यांचाही मुलगा त्याच शाळेत शिक्षण घेतो. त्यावेळी काही विद्यार्थी गोमांस वाटप करत असल्याचे सांगितले.
 
 
 
याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने आपल्या मुलाला सांगितले की, मणिपूरच्या विद्यार्थ्यांकडून काहीही विकत घेऊ नका. कारण ते कदाचित गोमांसही देत असतील. गुरूवारी त्याच मुलाला एका मणिपूरच्या विद्यार्थ्याने गोमांस खायला दिले. याप्रकरणी एका पालकाने माध्यमांना सांगितले की, मॅगीमध्येही गोमांस मिसळल्याची माहिती त्याच्या पाल्याने दिली होती. याप्रकरणी आता मुख्यध्यापकांना विचारण्यात आले असता, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. याप्रकरणी शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
 
तसेच जे विद्यार्थी जबरदस्तीने गोमांस देतात त्यांना संबंधित शाळेतून काढून टाकण्याचे आदेश दिले गेले आहेत. यावेळी मुख्यध्यापकांनी कारवाईची मागणी केली आहे. तसेच याउलट त्यांना शाळेतून काढून टाकू असे धमकावले गेले असल्याचे सांगण्यात आले.