रेल्वे कर्मचाऱ्यांनीच उघडली रेल्वेलाईनची फिश प्लेट, पण उघड झाले गुपित; वाचा संपूर्ण प्रकरण

    24-Sep-2024
Total Views |
railway-employees-removed-fish-plate


नवी दिल्ली :     गुजरातमधील सुरतमधील किम रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवरून फिश प्लेट्स आणि चाव्या काढून ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तिघेही रेल्वे कर्मचारी असून रेल्वे रुळावरून घसरण्याचा हा कट दि २१ सप्टेंबर रोजी हाणून पाडण्यात आला. पोलीस तपासात रेल्वे कर्मचाऱ्यांनीच ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याचे आढळून आले.




दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेन रुळावरून उतरवण्याचा कट रचण्यासाठी रुळावरून काही चाव्या आणि फिश प्लेट काढून त्याचे फोटो आणि व्हिडिओ बनवले. बडोदा विभागात ही घटना घडली तेव्हा रुळांवरून फिशप्लेट आणि चाव्या काढून टाकण्यात आल्या. तसेच, सर्व भाग अप लाईनमधून काढून टाकून डाऊन लाईनवर ठेवण्यात आले. या प्रकरणी कोणताही अपघात झाला नसल्याचे रेल्वेने सांगितले असून काही वेळाने रेल्वेसेवा सुरळीत झाली.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे ट्रॅकमन सुभाष पोद्दार आणि मनीष मिस्त्री आणि एक कंत्राटी कर्मचारी शुभम जयस्वाल अशी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणे, कट रचणे यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला. या तिघांवरही रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष पोद्दार यांनीच आपल्या अधिकाऱ्यांना ट्रॅकवरून फिश प्लेट हटवण्याबाबत माहिती दिली होती.