अंगणवाडी शिक्षक पदासाठी उर्दू यायलाच पाहिजे; काँग्रेस सरकारचा फतवा, भाजपची सडकून टीका

    24-Sep-2024
Total Views |
karnataka-congress-government-mandates-urdu


नवी दिल्ली :     चिक्कमगलुरु जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षिका होण्यासाठी उर्दू जाणणे अनिवार्य केल्याचा आरोप भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर केला आहे. निजामाच्या आत्म्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगत भाजपने काँग्रेस सरकार जोरदार टीकास्त्र सोडले आहे.


ते म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस निजाम आणि टिपूचे स्वप्न पूर्ण करत आहे. काँग्रेस सरकारने नुकतेच एका आदेशात म्हटले आहे की, चिक्कमगलुरु जिल्ह्यातील मुदिगिरी येथील अंगणवाडीतील शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना उर्दू यायलाच पाहिजे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण आणि विकास विभागाने (डीसीडब्ल्यू) हा आदेश दिला आहे.

दरम्यान, काँग्रेस सरकार कन्नडच्याही विरोधात असून आता कर्नाटकात उर्दू तुष्टीकरण होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. स्थानिक अंगणवाडी शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीच्या आदेशावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते सीटी रवी म्हणाले, "निजामाने हैदराबाद आणि कर्नाटकात कन्नड शिकविण्यावरही बंदी घातली होती आणि उर्दूचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता, आता निजामाचा आत्मा काँग्रेसमध्ये घुसला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

ते पुढे म्हणाले, टिपू सुलताननेही येथे फारसी शिकवण्यावर बंदी घातली होती. भाषा लादण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला काँग्रेस सरकार टिपू आणि निजामाची स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहे. निजामाच्या आत्म्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते कन्नडच्याही विरोधात आहेत.